Thursday 23 January 2020

आयुर्वेदिक औषधे.. समज गैरसमज


आयुर्वेद आणि आयुर्वेदिक औषधे यांच्या बाबतीत सध्या सर्वदूर खूप उत्सुकता आणि विश्वास वाढलेला दिसतो.एका दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे पण तरीही आयुर्वेदिक औषधांबद्दल जे काही समज आणि गैरसमज समाजात आहेत त्या बद्द्ल चर्चा करण्याची आणि ते सर्वांपर्यंत पोचवण्याची नितांत गरज आहे.
आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतात असा एक समज आहे 
खरतर कोणतहीऔषध जर चुकीच्या वेळी चुकीच्या परिस्थितीत चुकीच्या मात्रेत किंवा चुकीच्या प्रमाणात वापरले तर नक्कीच त्याचे वाईट परिणाम होतात आणि ही गोष्ट आयुर्वेदिक औषधांच्या बाबतही लागू आहे
आयुर्वेदिक औषधांचा परिणाम ...
या बाबतीत सुद्धा खूप गैरसमज आहेत
आयुर्वेदिक औषधे खूप उशीरा परिणाम करतात आणि खूप त्यांचा उपयोग दिसून यायला खूप वेळ लागतो अस बहुतेकांना वाटत.पण खरंतर बहुतेकवेळा रोगी त्याच्या रोगावरील उपचारासाठी ठिकठिकाणी फिरून आयुर्वेदिक तज्ञा कडे येतो .या दरम्यानच्या काळात त्याचा रोग खूप बाळावलेला असतो
ज्या रोगावर इतर ठिकाणी काहीही इलाज नाही असा निर्णय झालेला असतो त्या वेळी आयुर्वेदिक तज्ञ त्यावर उपाय करतात त्या मुळे त्याला थोडा जास्त वेळ लागला तरी सहाजिकच आहे. औषधाचा उपयोग अतिशय लौकर देखील दिसून येतो .रुग्णाचा आणि रोगाच स्वरूप या वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात
आयुर्वेदिक औषधांना एक्सपायरी डेट नाही असा फार मोठा गैरसमज समाजात आहे 
खरतर त्याच मुळे बाजारात विक्रीसाठी उपलबध्द असणाऱ्या चुर्ण स्वरूपातील औषधे म्हणूनच ताजी वापरणे अत्यंत आवश्यक आहे ,नाहीतर त्यांचा योग्य तेव्हढा  परिणाम दिसणार नाही हे नक्की
आयुर्वेदिक औषध घेताना खूप काळजी घ्यायला हवी योग्य तज्ञ आयुर्वेदिक चिकित्सकाच्या सल्ल्याने आणि योग्य पद्धतीने बनवलेली मान्यताप्राप्त कंपनीची औषधे घेतली तर आयुर्वेदिक औषधे ही नक्कीच वेगाने आणि कोणताही वाईट परिणाम म्हणजेच साईड इफेक्ट न करता रोगाचा मुळापासून सर्वनाश करतील हे निश्चित
......डॉ सौ कविता इंदापूरकर
प्रोफेसर व विभाग प्रमुख
भारती विद्यापीठ आयुर्वेद कॉलेज
पुणे